मुंबई विद्यापिठाच्या धोरणा नुसार, सन २०१०-११ ह्या शैक्षणिक वर्षांत 'अथांग' मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना महाविद्यालयात झाली. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीची जोपासना व संवर्धन व्हावे यासाठी 'अथांग' मराठी वाङ्मय मंडळ विविध उपक्रम राबवत असते.
विद्यार्थ्यांना मराठी संस्कृतीची, रिती रिवाजांची गोडी निर्माण व्हावी यासाठी 'अथांग' मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल-रुख्मिणीची दिंडी-पालखीचे आयोजन करुन, तसेच विद्यार्थ्याच्या पारंपरिक वेशभूषेने संस्कृतीचे जतन केले जाते.
विद्यार्थ्यांच्या सुप्तकला गुणांना वाव मिळावा म्हणून 'पावसाळी कविता' ह्या सदरात विद्यार्थ्यांच्या स्वरचित कविता भित्ती पात्रिके व्दारे सादर केल्या जातात. अथांगोत्सव ह्या कार्यक्रमात गायन, एकपात्री प्रयोग, नृत्याविष्कार इ. सादर केले जातात.
ह्या शिवाय अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या जयंती निमित्त व्याख्याने, लेझिम, ढोलताशे ह्यांचे आयोजन केले जाते. ह्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचा इतिहास व संस्कृती ह्याबद्दल रुची निर्माण होण्यास मदत होते.
मराठी संस्कृती, मराठी साहित्य, महाराष्ट्राचा इतिहास ह्या सगळ्यांचे दर्शन घडवण्याबरोबर 'अथांग' विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी ही कार्यरत असते. याकरता विविध क्षेत्रातील तज्ञ, मान्यवरांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले जाते.
अथांग
Go to the Top